दिंडीत वारकरी, माळकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंगवादक, चिपळीवादक, माता-भगिनी तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.यंदाची ही दिंडी देहू – आळंदी मार्गे पंढरपूर असा पवित्र प्रवास करणार असून, वाटेत विविध ठिकाणी हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा न बाळगता वारकरी अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भावनेने विठुरायाच्या भेटीसाठी पायी मार्गक्रमण करीत आहेत.हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी आणि असंख्य भाविकांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल मठाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली