मोहरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया उत्साहात संपन्न
पन्हाळा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार मोहरे, ता. पन्हाळा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली असून, मौजे मोहरे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत गुरुवार दिनांक ११ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, मोहरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.सदर कार्यक्रम मंडळ अधिकारी भाग कोडोली श्री. अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी ग्राम पंचायत अधिकारी श्री. जालंदरगिरी गोसावी, ग्राम महसूल अधिकारी सौ. अरुणा घाटगे, ग्राम महसूल सेवक श्री. प्रकाश सकटे, सरपंच श्री. प्रदीप डोईफोडे, उपसरपंच सौ. अमृता प्रवीण मोरे, तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागांमध्ये चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्याचा योग आला. यासाठी निष्पक्षतेच्या दृष्टीने कु. देवराज निवास जाधव (वय १३ वर्षे) या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. उपस्थितांच्या साक्षीने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
यावेळी जाहीर करण्यात आलेले प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे
प्रभाग क्रमांक १- सदस्य संख्या : ३- सर्वसाधारण महिला : २ सर्वसाधारण खुला : १
प्रभाग क्रमांक २
– सदस्य संख्या : ३
– सर्वसाधारण महिला : २
– सर्वसाधारण खुला : १
प्रभाग क्रमांक ३
– सदस्य संख्या : ३
– अनुसूचित जाती : १
– सर्वसाधारण महिला : १
– ओबीसी : १
प्रभाग क्रमांक ४
– सदस्य संख्या : २
– ओबीसी महिला : १
– सर्वसाधारण खुला : १ अशा प्रकारे मोहरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले असून, आगामी निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.