ब्रेकिंग न्यूज

विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे शाळेसाठी योगदान मोठे.मा. सरपंच विजय दादा शिंदे 


विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे शाळेसाठी योगदान मोठे.मा. सरपंच विजय दादा शिंदे 

नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
शिक्षणाचे महत्त्व जाणून घेऊन आपण सर्वसामान्य गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून बलवडी कन्या प्रशाला सुरू केली व आज इंग्लिश मीडियम व गुरुकुल निवासी शाळेचा प्रारंभ करताना आनंद होत असून, राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाची असून, आपण प्रपंचाचा विचार केला नाही व शाळेकडे लक्ष दिले व त्यामुळे आज दहावी मधून 25 पैकी 17 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये व प्रशालेचाही शंभर टक्के निकाल लागला आहे व याचे सर्व श्रेय मी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांना देत आहे व त्यांचे योगदान फार मोठे आहे असे मत मा. सरपंच विजय दादा शिंदे यांनी बलवडी इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुकुल निवासी शाळा उद्घाटन तसेच दहावी गुणवंत विद्यार्थी पालक सत्कार सोहळ्यात बलवडी कन्या प्रशालेत मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा वनाधिकारी माणिकराव भोसले हे होते.
सुरुवातीस सरस्वती मातेचे व हुतात्मा महादेवजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवराज भोसले, विजय दादा शिंदे, सेवानिवृत्त वनाधिकारी माणिकराव भोसले, सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, मा. सरपंच बाळासो शिंदे, प्रसाद शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, सोसा. चेअरमन शिवाजीराव शिंदे, सरपंच माऊली राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, रविराज शिंदे, रिपब्लिकन अध्यक्ष संजय करडे, सेवानिवृत्त शिक्षक डीपी कारंडे, चंद्रकांत यादव, मारुती शिंदे, पत्रकार रविराज शेटे, मुख्याध्यापिका रुक्मिणी कोडग, उद्योगपती भोपाल धायगुडे इ. हस्ते करण्यात आले. विजय दादांनी अनेक अडचणी मात करून बलवडी कन्या प्रशाला उभी केली व आज त्याचे वटवर्क्षात रूपांतर झाले असे मुख्याध्यापिका रुक्मिणी कोडग यांनी प्रास्ताविकात सांगितले तर बलवडी गावची शान व मान वाढवण्याचे काम विजय दादांनी केले परंतु त्यास सौ. सुषमा वहिनींची साथ मोलाची आहे व आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस ही आम्ही साजरा करीत आहोत असे मा. सरपंच बाळासो शिंदे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे मा. अध्यक्ष कै. रामदास भोसले गुरुजी व विजयदादा शिंदे यांनी बलवडी कन्या प्रशाला सुरू केली व शिक्षकांचे काम चांगले असे मत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले. तर सेवानिवृत्त शिक्षक डीपी कारंडे, चंद्रकांत यादव, प्रा. मारुती शिंदे विद्यार्थिनी प्राजक्ता शिंदे यांनीही शिक्षकांचे काम व संस्काराचे शिक्षण आहे असे यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक शिक्षकांचाही गुणगौरव करण्यात आला.
सदर प्रसंगी ग्राम. सदस्य सुरेश गुरव विकास पवार, मा. उपसरपंच विकास मोहिते, गणेश कमले, अण्णा सो मोहिते, बापू शिंदे, प्रगतशील शेतकरी मनोहर राऊत, मंडळ अध्यक्ष सर्जेराव मोहिते, संतोष धोत्रे, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिंदे परीवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सौ. दिपाली कोळसे पाटील यांनी तर आभार शिक्षक बंडू शिंदे यांनी मानले.
___________________________

लहान मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार द्या..
बलवडी सारख्या लहान गावात इंग्लिश मीडियम, गुरुकुल निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय दादा यांचे योगदान मोठे आहे व सुरुवातीस बलवडी कन्या प्रशाला व आता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले परंतु शिक्षण देत असताना लहान मुलांना संस्कार द्या.
*सेवानिवृत्त जिल्हा वन अधिकारी माणिकराव भोसले.*


Translate »
error: Content is protected !!