ब्रेकिंग न्यूज

घेरडीत माहितीसाठी उपोषण, अनिल मोटे यांचा ‘बॅनरमुक्त’ सत्याग्रह


घेरडीत माहितीसाठी उपोषण, अनिल मोटे यांचा ‘बॅनरमुक्त’ सत्याग्रह

ग्रामपंचायतीकडे ८८ दिवसांपूर्वी अर्ज करूनही माहिती न मिळाल्याने पायरीवर ठिय्या
घेरडी प्रतिनिधी शशीकांत कोळी : ग्रामपंचायत घेरडी येथील 2021 ते 2026 या कालावधीतील विकासकामांची माहिती मिळावी यासाठी 7 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज करूनही 88 दिवस उलटूनही माहिती न मिळाल्याने अनिल तानाजी मोटे यांनी आज सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वस्तुस्थिती:
1. सत्याग्रह ‘बॅनरमुक्त’: अनिल मोटे यांनी उपोषणस्थळी कोणताही वैयक्तिक बॅनर, पोस्टर किंवा फलक लावलेला नाही. कोणतीही घोषणाबाजीही सुरू नाही.
2. पोलीस बंदोबस्त: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगोला पोलिसांचे पथक घटनास्थळी तैनात आहे.
3. प्रकृती स्थिर: कडक उन्हात उपोषण करणाऱ्या अनिल मोटे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.  अनिल मोटे यांची भूमिका:
“माझा लढा कोणाविरोधात नाही. 7 मार्च रोजी ग्रामपंचायतीकडे 2021 ते 2026 च्या विकासकामांची माहिती मागण्यासाठी अर्ज दिला होता. 88 दिवस झाले तरी माहिती मिळाली नाही. म्हणून नाईलाजाने शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलो आहे. बॅनर न लावता, गोंधळ न करता न्याय मागतोय. ग्रामपंचायतीने नियमानुसार माहिती द्यावी, एवढीच अपेक्षा,” असे मोटे यांनी सीबीएस न्युज मराठीला सांगितले.
सद्यस्थिती:
सकाळ चे १०:३० वाजले असून अनिल मोटे ग्रामपंचायतीच्या पायरीवर बसून आहेत. 10-12 ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित असून प्रशासनाच्या पुढील कारवाईची वाट पाहत आहेत.


Translate »
error: Content is protected !!