ब्रेकिंग न्यूज

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे


पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

सांगोला / रवीराज शेटे – सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे मात्र, सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. कृष्णा कोयना भीमा पंचगंगा आणि नीरा नदीच्या पात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तत्काळ टेंभू उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्याला सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवर होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे विहिरी, तलाव आणि कुपनलिका तसेच अन्य जलस्रोतांनी तळ गाठल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कृष्णा, कोयना भीमा निरा पंचगंगा तसेच अन्य नद्यांच्या खोऱ्यात व घाटमाथ्यावर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. या नदीकाठील लोकांचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या सांगोला तालुक्यातील माणगंगा, कोरडा, आफ्रुका आणि बेलवण यासारख्या नद्या मात्र ऐन पावसाळ्यात कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे कृष्णा, कोयना,भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीतून वाहून जाणारे पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माणगंगा नदीत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत आणि नीरा नदीचे पाणी सांगोला शाखा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास आणि या पाण्यातून सांगोला तालुक्यातील छोट्या मोठ्या तलावांना पाणी सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त अशा दोन्ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणून राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ टेंभू योजना म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
चौकट ;
oplus_136314912
पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ; मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
सध्या कृष्णा, कोयना, निरा पंचगंगा या नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीच्या काठावरील लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना व नीर उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील

Translate »
error: Content is protected !!