ताज्या घडामोडी

भाव शुद्ध ठेवून नामस्मरण करा.. सयाजी गेंड महाराज


भाव शुद्ध ठेवून नामस्मरण करा.. सयाजी गेंड महाराज
( मा. प्राचार्य कै. सुबराव बंडगर सर पुण्यस्मरण सोहळा संपन्न…)
नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे


आपणास मिळणारे धन हे पवित्र असावे व त्यातील दहा टक्के धन हे दानधर्मासाठी असावे, तसेच भाव शुद्ध ठेवून नामस्मरण करावे असे सयाजी गेंड महाराज यांनी अनकढाळ ता. सांगोला येथे मा. प्राचार्य कै. सुबराव बंडगर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात कीर्तनात सांगितले. तसेच सरांचे विनायक व प्रताप ही दोन्ही मुले सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहेत.सध्या समाजात खिसे भरणारा व खिसे कापणारा यांची संख्या जास्त व त्यामुळे समाजाची अवस्था वाईट होते. धर्मशास्त्र सांगते मुलगा झाल्या झाल्या पेढा वाटू नये तो पेढे वाटायच्या लायकीचा झाल्यावर वाटा व प्रत्येकास मुलगा लाल दिव्याच्या गाडीत बसणारा आगर कीर्तनकार असावा असे वाटते व तो आई-वडिलांची सेवा करणारा असावा. कारण जीवनात सर्व काही मिळेल परंतु आई-वडील मिळणार नाहीत. आई-वडिलांचे प्रेम मुलावर व त्यापेक्षा मुलीवर जास्त असते व ज्या दिवशी मुलगी माहेर येते व जाताना पिशवी भरून नेते परंतु बाप मरतो त्या दिवशी तिचे माहेर संपते व जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत घराकडे तिरक्या नजरेने कोणी पाहत नाही, म्हणजेच आई-वडिलांना विसरू नका असे गेंड महाराज यांनी सांगितले.सदर प्रसंगी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मातोश्री रतन काकी देशमुख, डॉ. निकिता ताई देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख आवर्जून उपस्थित होते. तसेच शेतकरी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर व बंडगर कुटुंबीय उपस्थित होते. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी फुलाचा कार्यक्रम संपन्न झाला व महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Translate »
error: Content is protected !!