ताज्या घडामोडी

स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांची स्ट्रिंगआर्ट प्रतिकृती चर्चेत


स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांची स्ट्रिंगआर्ट प्रतिकृती चर्चेत

पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार वारणानगर ता पन्हाळा शिक्षणाचा महामेरू शिक्षण पंढरी म्हणून या वारणेचा देशात नावलौकिक व ख्याती असून वारणा उद्योग समूहाचे भाग्यविधाते स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे जनसामान्यांचा आधार एक देव माणूस व वटवृक्ष यांच्या कार्याचा प्रभाव तर सर्वत्र आहेच, पण आता त्यांच्या प्रतिमेची अनोखी कलात्मक झलक पाहायला मिळाली आहे. येळाणे (ता. शाहुवाडी) येथील तरुण कलाकार सोहेल रहीम मुल्लाणी यांनी तब्बल २४० खिळे व २३०० धाग्यांचा वापर करून स्ट्रिंगआर्टच्या माध्यमातून स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांची अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे.ही कलाकृती पूर्ण करताना संयम, वेळ आणि कौशल्याची गरज भासली. धाग्यांच्या गुंफणीतून तयार झालेली ही प्रतिकृती पाहणाऱ्यांची मने भारावून टाकणारी ठरत आहे. सोहेल मुल्लाणी यांच्या या उपक्रमाचे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे सोहेल मुल्लाणी यांनी ही प्रतिकृती पन्हाळा शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉ विनय रावजी कोरे ( सावकर ) साहेब यांना भेट म्हणून दिली यावेळी पन्हाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री विजय पाटील तसेच यांनी गावचे सरपंच श्री उल्हास शंकर भोसले त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी तुकाराम पाटील आयुब मकबुल मुल्लाणी मेजर प्रणव शेणेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होतेअसून, ग्रामस्थांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Translate »
error: Content is protected !!