ताज्या घडामोडी

नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने चालक दिन मोठ्या उत्साहात संपन्न


नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने चालक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सांगली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज कुपवाड एम.आय.डी.सी हेड ऑफिस येथे चालक बांधवांचा फुलगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करून त्यांना चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजू शिंदे यांनी सर्व चालक बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मा.अजित पाटील कोकण संपर्कप्रमुख मा.प्रकाश कांबळे मिरज तालुका संपर्कप्रमुख मा.गजानन शिंदे हे उपस्थित होते तसेच सांगली वाहतूक नियंत्रण शाखाचे प्रमुख मा.निकम साहेब व वाहन चालक मा.पाटील साहेब यांना नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे उपाध्यक्ष पत्रकार इरफानभाई बारगीर यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नंतर सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात मिशन हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल ॲम्बुलन्स स्टॉप इंडियन ऑइल डेपो स्टॉप विश्रामबाग वाहतूक नियंत्रण शाखा व अनेक चालकांच्या भेटीगाठी घेऊन सर्व चालक बांधवांना फुलगुच्छ देऊन सत्कार करून चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!