बहुउद्देशीय प्रशाला कडलासचे योगासन व किक बॉक्सिंग स्पर्धेत सुयश
सांगोला – भारत इंगवले – सांगोला तालुका पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सोमवार दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी क्रीडा संकुल सांगोला येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये बहुउद्देशीय प्रशालेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी पृथ्वीराज विलास गायकवाड द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी मयुरी अरविंद पवार चतुर्थ क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली सदरच्या स्पर्धेमध्ये प्रथम सात विद्यार्थी निवडण्यात येतात व त्यातील एक ते पाच क्रमांक विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात.
तसेच 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रशालेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रथमेश विजय भजनावळे याने 40 किलो वजनी गटात जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सदरच्या स्पर्धेसाठी मार्गदर्शक डॉ भारत इंगवले सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा पाटील व मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शिंदे यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.