ताज्या घडामोडी

ब्रह्मकुमारीज सेंटर मिरज मार्फत विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 41 युनिट रक्तसंकलन…


 

ब्रह्मकुमारीज सेंटर मिरज मार्फत विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 41 युनिट रक्तसंकलन…

सांगली प्रतिनिधी इरफान बारगीर – मिरज :- येथे प्रजा्पिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वितीय प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांचे 18 वे स्मृतिदिन व विश्व बंधूत्व दिनाच्या निमित्ताने आणि श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज यांच्या सहकार्याने आदर्श मंगल कार्यालय मिरज येथे रक्तदान शिबीर पार पडले यात एकूण 41 जणांनी रक्तदान करून एक राष्ट्रीय कार्य केले.यावेळी राजयोगिनी उर्मिला बेहेनजी यांनी उपस्थित सर्व पाहुणे, माता, भाई यांचा तीन मिनिट योग करून घेतला आणि ब्रह्मकुमारीज विद्यालयाचा परिचय व कार्य तसेच दादी प्रकाशमणी जी यांचे बद्दल माहिती राजयोगिनी मा निवेदिता बेहेनजी यांनी उपस्थित प्रमुख अतिथी यांना करून दिली.यानंतर सर्व पाहुण्यांचा परिचय मा युवराज भाई यांनी उपस्थित सर्वाना करून दिला व सर्व अतिथी यांचे मा राजयोगिनी उर्मिला दीदी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मा डॉ सोमशेखर पाटील सर (अध्यक्ष, वीरानंद चॅरिटेबल ट्रस्ट, मिरज ), मा डॉ सौ विद्या पाटील, मा सौ वर्षा कदम (अन्न व पुरवठा विभाग, नायब तहसिलदार, मिरज ), मा सुनील गिड्डे सर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग, मिरज ), मा अंकुश कोळेकर (माजी नगरसेवक ), मा राकेश तामगावे (अध्यक्ष, मिरज शहर सुधार समिती) या सर्वांच्या हस्ते राजयोगिनी प्रकाश मणी दादी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन केले. यात मा डॉ सोमशेखर पाटील सर यांनी रक्तदान हे राष्ट्रीय कार्य असून आपण एकदा रक्तदान केल्यावर आपल्याला तीन लोकांचे प्राण वाचवता येतात.रक्त हे मानवाच्या शरीरात तयार होते त्यामुळे आपण रक्तदान केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.सध्या रक्ताची गरज गंभीर आजार, प्रसूती आणि ऍनिमया, अपघात यासारख्या गंभीर प्रकारात खुप जाणवते अशी गरज ओळखून ब्रह्मकुमारीज,सेंटर मिरजने हे मानवता जपण्याचे काम रक्तदानाच्या माध्यमातून केले आहे याबद्दल विशेष कौतुक केले.यानंतर मा सौ वर्षा कदम (नायब तहसीलदार, मिरज ) यांनी रक्तदानाची गरज सर्वच मानवजातीला असल्याने या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी योगदान देऊया व विशेष करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन शरीरातील ऍनिमया दूर करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले व ब्रह्मकुमारीज मिरज सेंटरच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यानंतर मा सुनील गिड्डे साहेब (सहाय्यक निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग, मिरज ) हे म्हणाले की वाहतुकीचे नियम न पाळल्याने रस्ते अपघात होतात आणि मानवाचे प्राण वाचवण्यासाठी सुद्धा रक्तदान गरजेचे आल्याने अशा वेळी रक्तदानाची गरज भासते ही गरज ओळखून प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एक लाख रक्तसंकलन व सांगली जिल्ह्यात एक हजार युनिट रक्तसंकलन करण्याचे उद्दिष्ट पार करण्यासाठी ब्रह्मकुमारीज प्रयत्न करत आहे आणि याची नोंद गिनीज बुक मध्ये होत आहे याबद्दल विशेष अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यानंतर उदघाटन कार्यक्रमाचे व उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मा राजयोगिनी उर्मिला दीदी यांनी मानले.या शिबिरात एकूण 41 बाटल्या रक्तसंकलन श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज यांच्या मदतीने केले. सर्व रक्तदात्यांना ब्रह्मकुमारीज कडून विशेष प्रमाणपत्र, नाश्ता आणि ब्लड सेंटर कडून प्रमाणपत्र व रक्तदाता कार्ड देण्यात आले.यावेळी या रक्तदान शिबिरात माजी नगरसेवक मा अंकुश कोळेकर, ब्रह्मकुमारीज मिरजच्या राजयोगिनी मा उर्मिला दीदी, समर्थ भाई कोठीवाले, तुषार भाई कदम आणि एकूण ११ महिलांनी व दोन जोडप्यानी आणि एका कुटुंबातील तिघांनी असे रक्तदान केले याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले.सदरील रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमांस मिरजेतील अनेक मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. यात मा चंद्रकांत वाघ सर(पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग, मिरज ), मा अमित मोरे (ट्राफिक पोलीस, मिरज ), मा अवधूत कांबळे (होमगार्ड अधीक्षक, मिरज शहर ), मा सौ संगीता हारगे (माजी नगरसेविका, मिरज ), मा किरण कांबळे (जिल्हा अध्यक्ष, क्रांतिज्योती घरेलू कामगार संघटना, सांगली ), मा ऍड महेंद्र कोरे (अध्यक्ष, दि मिरज बार असोसियशन, मिरज ), मा राकेश तामगावे (अध्यक्ष, मिरज शहर सुधार समिती ), मा राजेंद्र जोशी (अध्यक्ष, निसर्ग सवांद मिरज ), मा महेश कुलकर्णी (अध्यक्ष, निरामय आनंदी कुटुंब मिरज ),मा स्वानंद कुलकर्णी (SK INVESTMENT) सांगली, मा धनंजय भिसे (अध्यक्ष, जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट, मिरज ), मा स्वप्निल जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष, सोशल मीडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सांगली जिल्हा ), मा आबासाहेब कागवाडे (अध्यक्ष, अभिनव संघटना, मिरज ), मा शाहीर रामलिंग तोडकर(उपाध्यक्ष, श्री रेणुका मंडळ, मिरज), मा बबन भंडारे (चेअरमन, श्री विश्वास नागरी सहकारी पतसंस्था, मिरज ), मा प्रा भीमराव धुळुबुळू(ज्येष्ठ लेखक व कवी ), मा डॉ विकास पाटील व सौ सीमा मिरजे चौगुले (जिल्हा कार्यकारिणी सदस्य, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, सांगली जिल्हा ) इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.ब्लड सेंटरकडून रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र व मोमेन्टो ब्रह्मकुमारीज मिरज सेंटरला देण्यात आले.ब्रह्मकुमारीज मिरज च्या वतीने या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मिरज सेंटरच्या प्रमुख मा निवेदिता बेहेन यांच्या मार्गदर्शनाखाली मा उर्मिला बेहेन,मा संतोषी दीदी आणि इतर सर्व भाई, बेहेन, माता यांनी मिळून केले.

Translate »
error: Content is protected !!