पारे गावातील येथील सामाजिक कार्यकर्ते विरूपक्ष सुतार यांचे निधन
सांगोला तालुक्यातील पारे गावातील सामाजिक कार्यकर्ते व हनुमान भक्त विरूपक्ष बाबासाहेब सुतार यांचे आज रात्री ९च्या आसपास अल्पशा आजाराने निधन झाले आहे .विशेषतः त्यांच्या पक्षात एक मुलगा सुन नातवंडे व दोन मुली असा परिवार आहे .पारे गावातील हनुमान मंदिराचे ते पुजारी होते. त्यांनी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता .आज त्यांची प्राण ज्योत मावली .त्यांच्या निधनाची वार्ता पारे परिसरात पसरल्यानंतर संपूर्ण गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तसेच आज रात्री ११:३० वाजता पारे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार असल्याचे माहिती सुतार कुटुंबाकडून देण्यात आली आहे.