
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘धडक-2’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन.
जातीय अन्याय, वर्गभेद आणि प्रेमातील स्वातंत्र्याचा प्रभावी संदेश प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

अतुल पवळे विशेष प्रतिनिधी
पुणे – आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर अध्यक्ष सागर नामदेव आल्हाट यांच्या वतीने ‘धडक-2’ चित्रपटाचा मोफत शो, हडपसर, Amanora Mall, Movie Max Theatre येथे आयोजित करण्यात आला, या उपक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रपटात निलेश (सिद्धांत चतुर्वेदी), एक दलित विद्यार्थी, आणि विधी (तृप्ती डिमरी), उच्च जातीतील वर्गमित्र, यांच्या प्रेमकथेतून जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. कॉलेज परिसरात निलेशला सतत तिरस्कार आणि अपमान सहन करावा लागतो, तर त्यांच्या प्रेमाला समाज आणि परंपरांची कठीण अडचण भेडसावते.दिग्दर्शकांनी भावनिक दृश्यांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव अधोरेखित केले असून, जातीय अन्याय, वर्गभेद आणि प्रेमातील स्वातंत्र्य या विषयांवर प्रभावी सामाजिक संदेश दिला आहे. त्यामुळे ‘धडक-2’ ही केवळ एक प्रेमकथा नसून सामाजिक जागृती करणारा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवतो.