ताज्या घडामोडी

पावसाच्या सरींमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न


पावसाच्या सरींमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न

पन्हाळा प्रतिनिधी – शंकर कुंभार

आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन पन्हाळा तालुक्यासह संपूर्ण देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. पन्हाळा शहरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या, मात्र देशभक्तीचा उत्साह ओलांडत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी जमले मुख्य सोहळ्याला जिल्हा परिषदेचे सदस्य व शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव मोरे ग्रामसेवक माननीय श्री जालिंदर गिरी गोसावी त्याचबरोबर ग्राम महसूल अधिकारी सौ अरुणा घाटगे मॅडम तसेच मोहरे हायस्कूल मोहरे मुख्याध्यापिका सौ मोहिते मॅडम उपाध्यक्ष माननीय श्री जेडी पायमल भाऊ तसेच संचालक माननीय श्री आनंदराव कुंभार सर तंटामुक्तीचे अध्यक्ष माननीय श्री पोपटराव लोंढे साहेब ग्रामपंचायत माजी सरपंच श्री आप्पासो शेळके तसेच प्राध्यापक माननीय शिवाजीराव मोहिते सर ग्रामपंचायत सदस्य मा श्री राम भाऊ भोसले व श्री हिंदुराव पाटील राजश्री शाहू पतसंस्था चेअरमन माननीय श्री ए बी शिंदे सर विद्या मंदिर प्राचार्य उपस्थित होते.

प्रमुख अतिथीं मा डे सरपंच सौ अमृता प्रवीण मोरे यांनी पूजन केले व सरपंच माश्री प्रदीप डोईफोडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. पावसामुळे गाव सभा व सत्कार समारंभ हा भैरवनाथ देवालयात संपन्न झाला तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद व देशभक्तीची लकेर होती.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शालेय मुलांच्या तोंडून झालेली घोषवाक्यांची गर्जना पावसाच्या आवाजालाही मागे टाकत होती. तसेच लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मा श्री बाबासो आनंदा पाटील तसेच पूजा जयसिंग नलवडे तसेच मा अनिकेत आनंदा शिंदे क्लास वन अधिकारी तसेच मा जीवन सुभाष खवरे क्लास वन अधिकारी पुणे कारागृह पोलीस मा ओकार शंकर कुंभार आदी यांचा यथोचित सत्कार घेण्यात आला . गावसभेत ग्रामसेवक यांनी विकास कामाचा आढावा वाचन केले तसेच भैरवनाथ देवालयाच्या गाव तळ्याचा विकासाचा आराखडा माननीय प्राध्यापक शिवाजीराव मोहिते सर यांनी सादर केला सूत्रसंचालन माश्री शिवाजी शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहरे गावचे प्रथम नागरिक मा श्री प्रदीप डोईफोडे यांनी केले


Translate »
error: Content is protected !!