नाझरे प्रतिनिधी / रवीराज शेटे
नाझरे ता सांगोला येथील आठवडा बाजारामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली व दर शुक्रवारी ही वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे व त्यामुळे शुक्रवारी वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे असे नागरिकांचे मत आहे.
नाझरे हे बाजारपेठेचे मोठे गाव असून आसपास अनेक गावे व वाड्या वस्ती आहेत त्यामुळे नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात व सायंकाळी पाच वाजता शाळा, हायस्कूल सुटल्यानंतर विद्यार्थी या रस्त्याने येतात, यातच रस्त्यावर उभी वाहने आडवी तिडवी लावल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात व यातून विद्यार्थ्यांना, महिलांना, वयोवृद्ध नागरिकांना वाट काढणे अवघड जात आहे. यातच रुग्णवाहिका अडकली परिणामी याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नाझरे हे सांगोला तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतुकीची योग्य नियोजन करणे आवश्यक आहे व यातच अवघड वाहने नाझरे मार्गे जातात व दुचाकी वाहनधारकांना यामधून वाट काढत कसरत करावी लागत आहे. तरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. व किमान शुक्रवारी तरी नाझरे आऊट पोस्टला पोलीस कर्मचारी हजर राहणे गरजेचे आहे व त्यामुळे वाहतुक सुरळीत होईल असे नागरिकात बोलले जात आहे.