ब्रेकिंग न्यूज

गुरुपौर्णिमेनिमित्त कोळेमठात गुरुदीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन..


गुरुपौर्णिमेनिमित्त कोळेमठात गुरुदीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन..

नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
श्री गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने तिसावे पिठाधिपती व श्री श्री श्री 108 गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 31सावे पिठाधिपती यांच्या गुरुतत्त्वाखाली व मार्गदर्शनाखाली कोळेमठात ता. सांगोला येथे गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 29 जुलै रोजी भव्य गुरु दीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 22 जुलै रोजी शि.भ.प. सौ जयश्री शीलवंत कोळे यांचे रात्र साडेसहा ते साडेआठ कीर्तन होईल व गुरुकृपा महिला भजनी मंडळ कोळे यांचे भजन होईल, गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी शिवभक्त सचिन महाराज कुंभार दिघंची यांचे शिव कीर्तन तर वीरभद्र महिला भजनी मंडळ नाझरे यांचे भजन होईल. शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी भाग्यश्री ताई इरकर धाराशिव यांचे कीर्तन तर वीरशैव महिला भजनी मंडळ आटपाडी यांचे भजन होईल, शनिवार दिनांक 25 जुलै रोजी रमेश महाराज करे कळंब यांचे कीर्तन तर बसवेश्वर महिला भजनी मंडळ सांगोला यांचे भजन होईल. रविवार दिनांक 26 जुलै रोजी शिवभक्त हनुमंत महाराज कोरे तांदूळवाडी यांचे कीर्तन तर सोमनाथ महिला भजनी मंडळ हातीद व वीरभद्र भजनी मंडळ नाझरे यांचा शिवपाठ होईल. सोमवार दिनांक 27 जुलै रोजी छगन महाराज कदम सांगवी यांचे कीर्तन तर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी संजय महाराज वेळापुरे यांचे कीर्तन तर मस्तान भजनी मंडळ माचनूर यांचे भजन होईल.
बुधवार दिनांक 29 जुलै रोजी भव्य दीक्षा विधी सोहळ्याचे आयोजन कोळेमठात केले असून, दीक्षा घेणाऱ्या शिवभक्तांनी सकाळी आठ वाजता मठात उपस्थित राहताना नारळ, लिंग, शिव दोरा, रुद्राक्ष, केळी, अक्षदा, नवीन वस्त्र, वाटी, केला किंवा तांब्या यापैकी एक पात्र व दक्षिणा इत्यादी साहित्य बरोबर आणावे. सकाळी आठ वाजता दीक्षाविधी कार्यक्रमास सुरुवात होईल तसेच महास्वामींचे आशीर्वाचन होणार आहे तरी शिवभक्तांनी हजर राहावे असे आवाहन गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व कोळे ग्रामस्थ यांनी केले आहे. यंदाचा गुरुपौर्णिमेचा महाप्रसाद गुरुभक्त अर्जुन मारुती खरसुडे तासगाव यांचा राहील. तसेच महास्वामींची कोळेगावातून भव्य मिरवणुकीने सप्ताहाची सांगता होईल.

Translate »
error: Content is protected !!