पुजा टूर्सचे संस्थापक विजय इंगवले यांचे निधन – आज दुपारी अंत्यविधी, १२ जुलैला तिसरा
सांगोला तालुक्यातील पारे येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि पुजा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संस्थापक विजय सिद्धेश्वर इंगवले वय ४५ यांचे आज दिनांक १० जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.गेली अनेक वर्षे त्यांनी पुजा टूर्सच्या माध्यमातून सांगोला आणि परिसरातील हजारो प्रवाशांना सेवाभावी वृत्तीने सेवा दिली. त्यांच्या मृदू स्वभावामुळे आणि प्रामाणिकपणामुळे ते सर्वांच्या जिव्हाळ्याचे होते.त्यांच्या पश्चात आई आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण सांगोला शहरावर शोककळा पसरली आहे.पारे येथील स्मशानभूमीत आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.परवा दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्या दिवसाचा विधी पार पडणार असल्याची माहिती इंगवले कुटुंबीयांनी दिली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏