ब्रेकिंग न्यूज

भाजप नेते राजू मगर यांचे बंधू अविनाश जाधव यांचे निधन; आज सांगोल्यात अंत्यसंस्कार सुप्रसिद्ध निवेदिका माधुरी जाधव यांचे पती; वयाच्या 47 व्या वर्षी निधन


भाजप नेते राजू मगर यांचे बंधू अविनाश जाधव यांचे निधन; आज सांगोल्यात अंत्यसंस्कार
सुप्रसिद्ध निवेदिका माधुरी जाधव यांचे पती; वयाच्या 47 व्या वर्षी निधन

सांगोला प्रतिनिधी – : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका  माधुरी जाधव मॅडम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती अविनाश जाधव, वय 47 यांचे आज दुःखद निधन झाले.माधुरी मॅडम ज्या आवाजाने अन्यायाविरुद्ध लढतात, त्या आवाजामागे खंबीरपणे उभा असणारा आधार म्हणजे अविनाश जाधव. त्यांनी कधीच स्वतः प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न केला नाही. पण माधुरी मॅडम यांच्या प्रत्येक समाजकार्याच्या आणि सामाजिक कार्याच्या यशामागे त्यांची मूक साथ होती. एका कर्तबगार महिलेच्या पाठीशी असणारा खरा जोडीदार म्हणून ते ओळखले जायचे. राजकीय-सामाजिक कुटुंब
अविनाश जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजू मगर यांचे लहान बंधू होते. त्यामुळे सांगोला आणि परिसरातील राजकीय-सामाजिक वर्तुळात त्यांना चांगला मान होता. शांत स्वभाव, मितभाषी आणि सर्वांना मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.मागे राहिलेला परिवार अविनाश जाधव यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी माधुरी जाधव आणि दोन मुले असा परिवार आहे. वयाच्या 47 व्या वर्षीच कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.अंत्यसंस्कार आजच स्व. अविनाश जाधव यांच्यावर आज गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता, सांगोला वैकुंठ भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जाधव कुटुंबियांना सांत्वन केले आहे. विशेषत अविनाश जाधव सरांचे सीबीएस न्युज परिवाराशी जवळचे संबंध होते कारण . माधुरी मॅडम या सीबीएस न्युज च्या जेष्ठ निवेदिका म्हणून हि काम पाहत होत्या…
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो 🙏

Translate »
error: Content is protected !!