ब्रेकिंग न्यूज

श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना व सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेचे आज भव्य दिव्य आयोजन


श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना व सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेचे आज भव्य दिव्य आयोजन..


नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
श्री दत्त मंदिर नाझरे, वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना व सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेचे आज भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 30 जून रोजी नाझरे गावातून श्री प्रभू रामचंद्र व कळस यांची भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित केली होती. यावेळी श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय, राम भक्त हनुमान की जय, समर्थ सद्गुरु संजीवास्वामी महाराज की जय, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त या जयघोषाने परिसर दुमदुमला. बुधवार दिनांक १ जुलै रोजी बुधवार दिनांक सकाळी सात वाजले पासून श्री दत्त मंदिरात श्री प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम तसेच समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेस सुरुवात होणार आहे.
सदर कार्यक्रमास श्री श्री 108 महंत सुंदर गिरीजी महाराज पुसेगाव, श्री श्री 108 श्री महंत आनंद गिरीजी महाराज देशिंग, श्री श्री 108 श्रीमंत भास्करगिरी महाराज शुक्राचार्य, श्री श्री 108 श्रीमंत बजरंग गिरीजी महाराज कोरेगाव, श्री श्री 108 तुकाराम गिरीजी महाराज कुंडल यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर महाराजांचे प्रवचन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता ह भ प सागर महाराज वाघ शेरेवाडी कर नातेपुते यांचे कीर्तन होणार आहे तरी सदर कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीव आश्रम नाझरे, वझरे तर्फे करण्यात आले आहे ‌


Translate »
error: Content is protected !!