ताज्या घडामोडी

सांगोला विद्यामंदिर पतसंस्थेच्या मानद सचिवपदी अष्टपैलू शिक्षक नरेंद्र होनराव यांची निवड


सांगोला विद्यामंदिर पतसंस्थेच्या मानद सचिवपदी अष्टपैलू शिक्षक नरेंद्र होनराव यांची निवड

सांगोला (प्रतिनिधी – रवीराज शेटे
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोला या संस्थेच्या मानद सचिवपदी संस्थेचे अष्टपैलू शिक्षक नरेंद्र होनराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नरेंद्र होनराव हे एक आदर्श विज्ञान व क्रीडाशिक्षक म्हणून परिचित असून, उत्कृष्ट नियोजक म्हणून त्यांची ख्याती आहे. कितीही मोठा कार्यक्रम असो, एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली की तो यशस्वी होणारच, अशी त्यांची ओळख आहे. नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहून कामाला प्राधान्य देणारे, अहोरात्र झटणारे आणि सूक्ष्म व्यवस्थापन करणारे एक परिपूर्ण व्यक्तित्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यामुळेच त्यांना संस्थेने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे..
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, प्राचार्य चारूदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदिप धुकटे,उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था अधिक सक्षम व पारदर्शक होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.गुणसंपन्न नेतृत्व: पतसंस्थेला नवी दिशा नरेंद्र होनराव यांच्याकडील उत्तम व्यवस्थापन कौशल्य पतसंस्थेच्या प्रगतीला गती देणारे ठरेल. कोणतीही अडचण सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय साधून सहज सोडवण्याची अफाट हातोटी त्यांच्याकडे आहे. कोणतेही अडचणीचे किंवा जोखमीचे काम स्वतःहून पुढे होऊन एक ‘आव्हान’ म्हणून फत्ते करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. नेहमी प्रसिद्धीविन्मुख राहून शिक्षकांना वेळोवेळी मदत करणारे हक्काचे व्यक्तित्व, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती यामुळे पतसंस्थेचा कारभार सुरळीत चालून सभासदांचा मोठा फायदा होणार आहे.

Translate »
error: Content is protected !!