ब्रेकिंग न्यूज

विशेष बातमी – नदीम खलिफा अध्यक्ष, हिंद ए आझाद खलिफा उपाध्यक्ष तर सचिवपदी अल्लादिन शेख : पारे गावात मोहरमची जय्यत तयारी


विशेष बातमी – नदीम खलिफा अध्यक्ष, हिंद ए आझाद खलिफा उपाध्यक्ष तर सचिवपदी अल्लादिन शेख : पारे गावात मोहरमची जय्यत तयारी


_संस्थापक अध्यक्ष चाॅदभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली बैठक, 23 ते 26 जून दरम्यान पारंपारिक मोहरम_

सांगोला तालुक्यातील पारे गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी ‘याराना एकता मोहरम कमिटी’ यंदाही पारंपारिक पद्धतीने मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. संस्थापक अध्यक्ष चाॅदभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. नवी कार्यकारिणी जाहीर यंदा अध्यक्षपदी नदीम मुहम्मद खलिफा, उपाध्यक्षपदी हिंद ए आझाद रसूल खलिफा तर सचिवपदी अल्लादिन हमीद शेख यांची निवड झाली. सहसचिव नौशाद बाळू खलिफा आणि खजिनदार बगदाद खलिफा काम पाहणार आहेत. सदस्य म्हणून करीम शेख, नादर शेख, हमीद शेख, शाहजहान खलिफा, मुहम्मद खलिफा, बाळू खलिफा यांचा समावेश आहे. 23 ते 26 जून दरम्यान कार्यक्रम
दि. 23 जून 2026 रोजी सायंकाळी 6.30 वा. जामा मस्जिद, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ताबूत व पंजे बसविण्यात येणार आहेत. दि. 25 जून रोजी रात्री 7 वा. ‘खतलरात्र’ होईल. मुख्य विसर्जन मिरवणूक दि. 26 जून रोजी सायंकाळी 5 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. मिरवणुकीत पारंपारिक हलगी व ढोल वाजणार आहेत. ऐक्याचा निर्धार हिंदू मुस्लिम याराना एकता’ या नावाप्रमाणेच गावात सर्व समाज बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. यंदाही शांततेत व उत्साहात सण साजरा करण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Translate »
error: Content is protected !!