ताज्या घडामोडी

वारणा दूध संघात कामगारांचा गुणगौरव सोहळा संपन्न


वारणा दूध संघात कामगारांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पन्हाळा प्रतिनिधी : शंकर कुंभार – वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष मा श्री एच आर जाधव साहेब व कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर साहेब यांच्या शुभहस्ते गुणवंत कामगार पुरस्कार मोहरे ता पन्हाळा या ग्रामीण भागातील श्री सुनील पांडुरंग सुतार व श्री उमेश दत्तात्रय जगदाळे व श्री अमर भीमराव भोसले आदी कामगारांचा भव्य ‘गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास माननीय आमदार विनय रावजी कोरे सावकर साहेब प्रमुख उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सावकर साहेबांनी कामगार वर्ग हा कोणत्याही संस्थेचा कणा असून, त्यांच्या निष्ठा, मेहनत व प्रामाणिक कार्यामुळेच वारणा दूध संघ आज उंची गाठत असल्याचे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसून येत होती.या सोहळ्यात दूध संघाचे राजवर्धन मोहिते प्रदीप देशमुख महेंद्र शिंदे माधव गुळवणी के आर पाटील मयूर पाटील अरुण पाटील दीपक पाटील डॉ मिलिंद हिरवे चंद्रशेखर युवा नाझिया मुल्ला शोभा पाटील लालासो पाटील यांच्यासह पर्सोनिल मॅनेजर बीबी चौगुले व पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याच्या निमित्ताने कामगार आणि संस्थेमध्ये असलेली आपुलकी व बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Translate »
error: Content is protected !!