काशी पिठाच्या जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात नाझरे येथे भव्य ग्रंथ दिंडी, धर्म जागृती व आशीर्वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न…
नाझरे प्रतिनिधी – रवीराज शेटे
ज्येष्ठ अधिक मासानिमित्त नाझरे ता. सांगोला येथे वीरशैव लिंगायत समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांच्यावतीने धर्म जागृती, मार्ग हा मुक्तीचा, ग्रंथ दिंडी व गावातून भव्य मिरवणूक व आशीर्वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री श्री श्री 1008 काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्री श्री श्री 108 वेदांताचार्य गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी, श्री श्री श्री 108 डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी व श्री श्री श्री 108 श्री गुरु निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कळस रोहणासह भव्य मिरवणुकीसह कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी नाझरे बाजार चौकात जगद्गुरुंचे स्वागत प्रवीण पाटील व भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीस जगद्गुरु व शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .व यावेळी वीरभद्र मंदिरात जगद्गुरूंचे स्वागत सुनील चौगुले, अशोक पाटील सुरेश काका चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व शिवाचार्यांचेही स्वागत करण्यात आले. गुरु भक्ती ही पैशाने मोजता येत नाही तर त्यासाठी अंतकरणात प्रेम, निष्ठा व भक्ती याचे समर्पण लागते तसेच सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मज्ञान आणि भक्तीचा मार्ग सापडत नाही. गुरु वरील निष्काम श्रद्धा आणि त्यांच्या चरणी समर्पण हेच मनुष्य जीवनाचे सार्थक करते तसेच 32 वर्षानंतर आज नाझरे गावात सुवर्ण अक्षराने लिहिलेला क्षणाला तसेच नाझरेकरांनी ग्रंथ दिंडीचा उच्चांक केला.व यापूर्वी समाजाचे आधारस्तंभ वसंतराव अण्णा पाटील यांनी अड्ड पालखी गावात करून समाज संघटित केला असे प्रस्ताविकात रविराज शेटे यांनी सांगितले.
वीरशैव धर्म श्रेष्ठ आहे व लिंग पूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये, लहान मुलावर लिंग बांधून संस्कार करा व लिंग धारण करत नसेल तर घरातून हाकलून द्या इतके लिंगाविषयी प्रेम व्यक्त करून, धर्म जागृती संदेश डॉक्टर जगद्गुरु चंद्रशेखर महास्वामीजी यांनी यावेळी आशीर्वाचनातून दिला तसेच नागरेकरांनी ग्रंथ दिंडीचा उच्चांक केला यामुळे 32 वर्षांपूर्वी वसंतराव पाटील यांच्यामुळे अड्ड पालखी सोहळा झाला व सभा मंडप पूर्ण झाला असेही महास्वामिनी सांगितले. तसेच शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी, शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी व शिवाचार्य कोळेकर महास्वामीजी यांनीही गुरु, लिंग व जंगम यांची माहिती आशीर्वाचनातून दिली. यावेळी डॉ. सौ व श्री महेश जोंधळे, सौ व श्री सुनील चौगुले, सौ व श्री राजू पाटील, सौ व श्री संतोष स्वामी, सौ व श्री काशिनाथ शेळके या उभय दांपत्याच्या हस्ते काशी जगद्गुरु महास्वामींची पाद्य पूजा करण्यात आली. तसेच महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. पुरोहित म्हणून रविराज स्वामी व सर्व स्वामी बंधूंनी कामकाज केले. यावेळी नाझरे, वझरे, कारंडेवाडी समाजबांधव व ग्रामस्थ , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.