घेरडीत शिक्षण घोटाळा उघड: विद्यार्थीच शिपाई, शिपाईच शिक्षक झाल्याचा यशवंत पुकळे यांचे आरोप
घेरडीत शिक्षण घोटाळा उघड: विद्यार्थीच शिपाई, शिपाईच शिक्षक झाल्याचा यशवंत पुकळे यांचे आरोप
सांगोला प्रतिनिधी- शशीकांत कोळी : तालुक्यातील घेर्डी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दोन शिपायांच्या नेमणुका बोगस व बनावट असल्याचा गंभीर आरोप संस्थेचे विश्वस्त यशवंत दगडू पुकळे यांनी केला आहे.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सोलापूर यांना दि. 04/06/2026 रोजी दिलेल्या 4 पानी तक्रार अर्जात पुकळे यांनी या नेमणुकांवर आक्षेप घेतला आहे. तक्रारीतील ठळक मुद्दे:1) पहिला शिपाई प्रकरण: तक्रारीनुसार, नेमणुकीच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्याचे वय 18 वर्षांपेक्षा 32 दिवसांनी कमी होते. 2003-04 मध्ये तो जवाहर विद्यालय, घेर्डी येथे 10वीत शिकत होता आणि मार्च 2005 मध्ये दहावी पास झाला. तरीही 20.10.2004 च्या मान्यता पत्रात ‘एस.एस.सी. पास’ असल्याचा उल्लेख आहे. 2.) दुसरा शिपाई प्रकरण: दुसऱ्या कर्मचाऱ्याला 09.06.2003 पासून शिपाई पदाची मान्यता असताना,2002 ते 2004 तो जवळे येथे 11वी-12वी शिकत होता. पुढे 2004 ते 2008 काकासाहेब साळुंखे महाविद्यालयात बी.ए. करताना त्याने शिष्यवृत्तीही घेतली.धक्कादायक म्हणजे दि. 07.01.2013 रोजी शिपाई पदावर असतानाच त्याला ‘सहशिक्षक’ म्हणून मान्यता दिल्याचा दावा पुकळे यांनी केला आहे.पुकळे यांचा मुख्य आक्षेप: ज्या दिवशी नेमणूक दाखवली, त्या दिवशी शाळेत एकही शिपाई पद रिक्त नव्हते संस्थेने किंवा शालेय समितीने नेमणुकीचा ठरावच मंजूर केला नव्हता.तसेच मान्यता देणारे पत्र दि. 20.10.2004 चे असून त्याला जावक क्रमांकच नाही आणि मान्यता 1 वर्ष 4 महिने आधीच्या तारखेपासून दिली गेली.कोणावर आरोप -:संस्थेचे अध्यक्ष सचिव तथा मुख्याध्यापक व लिपीक यांनी संगनमताने खोटी माहिती देऊन शासनाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. विश्वस्तांची मागणी:- दोन्ही शिपायांची मान्यता रद्द करून, संबंधितांवर निलंबन व फौजदारी कारवाई करावी. पुकळे यांनी म्हटले आहे की याबाबत 2009 मध्येही तक्रार दिली होती, पण दखल घेतली गेली नाही. सीबीएस न्युज मराठीकडे तक्रार अर्जाची प्रत उपलब्ध आहे.संस्थाचालक व शिक्षण विभागाची प्रतिक्रिया मिळालेली नाही. ती मिळताच प्रसिद्ध केली जाईल.




