ब्रेकिंग न्यूज

श्री काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा 2026 मोहरे ता. पन्हाळा येथे भक्तीभावात संपन्न


श्री काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा 2026 मोहरे ता. पन्हाळा येथे भक्तीभावात संपन्न

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार आज मंगळवार दिनांक ५ मे २०२६ रोजी धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री काशिलिंग बिरदेव या देवाचा जन्मकाळ सोहळ्याचा उत्सव मोहरे गावात अत्यंत भक्तीमय वातावरणात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या पवित्र सोहळ्यानिमित्त पहाटे श्री बिरदेवांच्या मूर्तीची विधिवत पूजा व अभिषेक समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला. तसेच माता-भगिनींनी पारंपारिक पाळणा गीतांच्या स्वरांनी मंदिर परिसर भक्तीने भारावून टाकला आणि जन्मकाळ सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.यानंतर धनगर समाजाच्या पारंपारिक पद्धतीनुसार श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. ढोल-ताशा तसेच खैताळ या पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले
मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याची उधळण व पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच “जय बिरदेव” च्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले.या सोहळ्यात मोहरे गावातील समस्त धनगर समाज, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रद्धा, भक्तीभाव आणि एकोप्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा सर्वांच्या मनात आनंद निर्माण करणारा ठरला.धनगर समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे जतन करणारा हा जन्मकाळ सोहळा गावासाठी प्रेरणादायी ठरला असून, हा जयंती सोहळा श्री बिरदेव तरुण मंडळ व समस्त धनगर समाज मोहरे यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

Translate »
error: Content is protected !!