ताज्या घडामोडी

Padmini College of Pharmacy व RACE Institute यांच्यात सामंजस्य करार (MOU) संपन्न


Padmini College of Pharmacy व RACE Institute यांच्यात सामंजस्य करार (MOU) संपन्न


सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर
आटपाडी (दिघंची )येथील पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि रेस इन्स्टिट्यूट यांच्यात शैक्षणिक व कौशल्यविकास सहकार्याबाबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश फार्मसी विद्यार्थ्यांना आयटी व हेल्थकेअर क्षेत्रातील उदयोन्मुख संधींसाठी सक्षम बनविणे हा आहे.या कराराअंतर्गत मेडिकल कोडिंग अँड बिलिंग, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोव्हिजिलन्स (PV) तसेच क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (CDM) या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कार्यशाळा, गेस्ट लेक्चर्स आणि प्लेसमेंट सहाय्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार असून त्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळेल.करार स्वाक्षरी समारंभ प्रसंगी इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. ईश्वर मोरे पाटील आणि सचिव सौ स्वातीताई मोरे पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमित पानसकर संस्थांचे प्रतिनिधी आणि RACE Institute चे प्रतिनिधी उपस्थित होते. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळून त्यांचे करिअर अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.महाविद्यालयाच्या वतीने रेस इन्स्टिट्यूटचे आभार मानण्यात आले तसेच भविष्यातही अशा सहकार्य उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. भाग्यश्री पानसकर, एम फार्मसी विभाग प्रमुख डॉ कोत्रेश यालिगर आणि डॉ बोयापती मधुलता, तसेच डी फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापिका कोमल चंदनशिवे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर श्री. दिनेश शिंगाडे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!