मोहरे गावातील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी आनंदा तुकाराम मगदूम (भाऊ) यांचे दुःखद निधन; गावावर शोककळा
मोहरे गावातील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी आनंदा तुकाराम मगदूम (भाऊ) यांचे दुःखद निधन; गावावर शोककळा
पन्हाळा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार मोहरे ता पन्हाळा गावातील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी आनंदा तुकाराम मगदूम (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मोहरे गावासह मगदूम (माळी) कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे.गावात “भाऊ” या नावाने परिचित असलेले आनंदा मगदूम हे अत्यंत शांत, मनमिळावू आणि सहृदय स्वभावाचे होते. समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या साधेपणामुळे आणि मदतीच्या वृत्तीमुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.परंतु ईश्वर इच्छेपुढे कोणाचेही काही चालत नाही.
काळाच्या कठोर आघाताने भाऊंची प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याने मगदूम (माळी) कुटुंब तसेच संपूर्ण मोहरे गाव गहिवरून गेले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखी कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन




